Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Kolhapur › नोकरदार वर्गाने युनिव्हर्सल अकौंट क्रमांक घ्यावा : प्रसाद

नोकरदार वर्गाने युनिव्हर्सल अकौंट क्रमांक घ्यावा : प्रसाद

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्यांचा  प्रॉव्हिडंट फंड जमा होतो अशा प्रत्येक नोकरदार वर्गाने युनिव्हर्सल अकौंट क्रमांक घेणे बंधनकारक आहे. सरकारच्या धोरणानुसार 15 ऑगस्टपासून भविष्य निर्वाह निधीचे कामकाज पेपरलेस (कागदमुक्‍त) होणार असल्याची माहिती भविष्य निर्वाह कार्यालयाचे विभायीय आयुक्‍त सौरभ सुमन प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, कोल्हापूर विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमधून 11 लाख लोकांची भविष्य निर्वाह विभागाकडे नोंद आहे. भविष्य निर्वाह निधीचे दावे दाखल करण्याची प्रचलित पद्धती बंद करून पेन्शन वगळता सर्व प्रकारचे दावे  ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. यामध्ये सुलभता येण्यासाठी सभासदांना युनिव्हर्सल अकौंट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक आधार व बँक खात्याला जोडणे आवश्यक आहे. 

या कार्यालयाकडून सर्व सभासदांना हा यूएएन क्रमांक देण्यात आला आहे. याची माहिती सर्वांनी करून घेणे बंधनकारक आहे. ज्यांनी हा क्रमांक घेऊन आधार व बँक खाते संलग्‍न केले आहे त्यांना केव्हाही आपल्या फंडाची रक्‍कम काढणे, त्याची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. ऑनलाईनवर अर्ज केल्यानंतर 3 ते 5 दिवसांत फंडाची रक्‍कम आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकते. 

यापूर्वी हा यूएनआय कोड चालू करून घ्यावा यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 25 टक्के सभासदांनी आधार नंबरची जोडणी केली आहे. तर 27 टक्के यूएएनधारकांनी बँक खात्याची जोडणी केली आहे. दोन्ही जोडणी करणारे यूएएन ग्राहक केवळ 19 टक्के आहेत. 2015 पासून सर्व संस्थांना  डिजिटल व सिग्‍नेचर ई साक्षांकन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. पण, कोल्हापूर विभागाकडून त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.