होमपेज › Kolhapur › अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा शोध सुरू करण्याची मागणी

अश्‍विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा शोध सुरू करण्याची मागणी

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा शोध पुन्हा सुरू करण्याची मागणी कुटुंबीयांच्या वतीने पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे निवदेनाद्वारे करण्यात आली. संशयित आरोपींविरोधात न्यायालयात दाखल दोषारोपपत्र भक्कम करण्यासाठी अधिक पुरावे जोडण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली. 

निवेदनामध्ये, गेले दोन महिने थांबलेली मृतदेह शोधमोहीम पुन्हा सुरू करावी, साक्षीदारांवर दबाव आणण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नाची खबरदारी घेऊन त्यांना संरक्षण मिळावे, 19 मे 2018 रोजी पनवेल न्यायालयात दाखल दोषारोपपत्राचा अधिक तपास करून पुरवणी जोडण्यात यावी, जेणेकरून आरोपींना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत. बिद्रे यांचा भाऊ आनंद बिद्रे व पती राजू गोरे यांनी याबाबत संजयकुमार यांच्याशी चर्चा केली.