Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Kolhapur › तारळे बंधार्‍यावरून कंटेनर कोसळला

तारळे बंधार्‍यावरून कंटेनर कोसळला

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:10AM

बुकमार्क करा
कसबा तारळे : वार्ताहर

समोरून येणार्‍या मोटारसायकलस्वाराला चुकविताना ताबा सुटून मालवाहतूक कंटेनर   कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील भोगावती नदीवरील बंधार्‍यावरून थेट नदीत कोसळला. यामध्ये चालक गुरुनाथ लक्ष्मण व्हरकट (वय 30, रा.पिरळ) किरकोळ जखमी झाला तर कंटेनरमध्ये बसलेले चार शालेय विद्यार्थी सुदैवाने बचावले. सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.

मुंबई येथील महालक्ष्मी एंटरप्राएजेस या ट्रान्सपोर्ट कंपनीचे चार कंटेनर कोल्हापूरहून गोव्याकडे माल वाहतूक करतात. यामधील एक कंटेनर (एमएच 09 सीयू 6258)  दुपारी कोल्हापूरहून गोव्याकडे जात असताना सायंकाळी सहाच्या सुमारास कसबा तारळे येथील भोगावती नदी  बंधार्‍यावर आला.  

समोरून येणार्‍या मोटारसायकलला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट पश्‍चिमेकडील बाजूला भोगावती नदीत कोसळला. कंटेनरमध्ये चालकासह चार शालेय विद्यार्थी  होते. ते सुदैवाने बचावले, तर चालक गुरुनाथ व्हरकट किरकोळ जखमी झाला. बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली.