Wed, Feb 19, 2020 09:30होमपेज › Kolhapur › निम्म्या शहराचा आज पाणीपुरवठा बंद

निम्म्या शहराचा आज पाणीपुरवठा बंद

Published On: Dec 11 2017 1:39AM | Last Updated: Dec 11 2017 1:32AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या शिंगणापूर उपसा केंद्राचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत खंडित होणार असल्याने शहरातील निम्म्याहून अधिक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणतर्फे  देखभाल दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहरातील ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ वॉर्ड व त्यास संलग्‍नित उपनगरे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सोमवारी पुरवठा बंद राहणार असून मंगळवारी या भागात अपुरा व कमी दाबाने पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या वतीने आठ टँकरद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे. 

‘ए’ व ‘बी’ वॉर्डातील सानेगुरुजी वसाहत परिसर, बुद्धीहाळकरनगर, सुर्वेनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी, आपटेनगर परिसर, देवकर पाणंद, नाळे कॉलनी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, तपोवन परिसर, जरगनगर, रायगड कॉलनी, रामानंदनगर, संभाजीनगर, कामगार चाळ, जवाहरनगर, सुभाषनगर, शेंडा पार्क, आर. के. नगर, पाचगाव परिसर तसेच ‘ई’ वॉर्डातील शिवाजी उद्यमनगर, बागल चौक, शाहू मिल चौक, संपूर्ण राजारामपुरी परिसर, साईक्स एक्स्टेंशन, टाकाळा, माळी कॉलनी, काटकर माळ, शाहूनगर, राजेंद्रनगर, दौलतनगर, यादवनगर,

शास्त्रीनगर परिसर, प्रतिभानगर, शिवाजी विद्यापीठ परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर परिसर, लोणार वसाहत, मार्केट यार्ड परिसर, रूईकर कॉलनी, शिवाजी पार्क परिसर, शाहूपुरी पहिली ते सहावी गल्ली, न्यू शाहूपुरी परिसर, नागाळा पार्क, रमणमळा परिसर, ताराबाई पार्क परिसर, कारंडे मळा, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी परिसर, बापट कॅम्प, गोळीबार मैदान परिसर, कसबा बावडा, लाईन बझार या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.