Sun, Aug 25, 2019 01:51होमपेज › Kolhapur › वाहनामध्ये अजिंक्य रहाणेचे कुटुंबीय

कारची धडक; वृद्धा ठार

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:39AM

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

कागल बस स्थानकाशेजारील जोड पुलाजवळ महामार्ग ओलांडताना लक्ष्मीबाई दादासाहेब कांबळे (वय 67, रा. इचलकरंजी) या वृद्ध महिलेचा गुरुवारी सकाळी कारच्या जोरदार धडकेत अपघाती मृत्यू झाला. कारमध्ये क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे व कुटुंबीय होते.

निपाणीकडे जाणार्‍या कारने (एमएच - 03 - सीबी 2021) जोराची धडक दिल्याने वृद्ध महिला रस्त्यावर आपटून त्यांना जोराचा मार बसला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापुरात सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद कागल पोलिसात झाली आहे.