Fri, Jul 19, 2019 16:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक (व्हिडिओ)

कोल्हापूर : शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक (व्हिडिओ)

Published On: Feb 10 2018 11:40AM | Last Updated: Feb 10 2018 11:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

हणबरवाडी नजीक शार्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी बस जळून खाक झाली. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने ही घटना चालकाच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

कोल्हापूर - गारगोटी बस प्रवासी घेवून गारगोटीकडे जात होती. हणबरवाडी येथे शॉर्टसर्किटने बसला अचानक आग लागली. चालकाला एसटीस आग लागल्याचे लक्षात येताच त्याने गाडी गिअर मधून काढल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली.

दरम्यान यावेळी प्रवासी तत्काळ बाहेर आल्याने सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजते. वेळीच घटनास्थळी पोहचत अग्निशमन दलाच्या जवानानी ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले.