Thu, Nov 14, 2019 06:10होमपेज › Kolhapur › पुईखडी माळावर बैलगाडी शर्यत पोलिसांनी पाडली बंद

पुईखडी माळावर बैलगाडी शर्यत पोलिसांनी पाडली बंद

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:27AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

राधानगरी रोडवरील पुईखडी माळावर आयोजित बैलगाडी शर्यत पोलिसांनी बंद पाडली. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी प्रभाकर शिवाजी हराळे (वय 32), शुभम एकनाथ हराळे (20), रणजित कृष्णात शेळके (25, सर्व रा. पिरवाडी, करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिरवाडी गावातील काही जणांनी उत्स्फूर्तपणे बैलगाडी, घोडागाडी शर्यतींचे आयोजन केले होते. तीन हजार, दोन हजार व एक हजार अशी बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार होती. सकाळी आठच्या सुमारास बैल व घोडा शर्यतीला सुरुवात झाली. याची माहिती करवीर पोलिसांना मिळताच त्यांनी पुईखडी माळावर जाऊन शर्यत बंद पाडली. पोलिसांनी माहिती घेतली असता पिरवाडीतील हराळे व शेळके यांनी आयोजन केल्याचे पुढे आले. 

न्यायालयाने बंदी घातलेली असताना स्पर्धा आयोजित करणार्‍या संयोजकांवर प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 चे कलम 3, 11 (2), 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सरकारतर्फे पोलिस नाईक विलास जाधवर यांनी फिर्याद दिली.