Tue, Sep 25, 2018 09:38होमपेज › Kolhapur › बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत आढळला

बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत आढळला

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 24 2018 10:20PMइचलकरंजी : प्रतिनिधी

शांतीनगर येथील उमेश सुकमार बेनाडे (वय 27) हा गुरुवार (दि. 12) पासून बेपत्ता होता. पंचगंगा नदीत सकाळी 7.30 च्या सुमारास उमेश याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. शांतीनगर येथील उमेश बेनाडे हा 12 एप्रिलपासून बेपत्ता होता. तो व्यसनी होता. तसेच मानसिक त्रासामुळे त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू होते. तो घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्याची वर्दी पत्नी सौ.पूनम बेनाडे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह पंचगंगा नदीत तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. खिशातील डायरीवरून मृतदेह उमेशचा असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर याबाबतची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. उमेशने दारूच्या व्यसनातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Tags : Kolhapur, body,  unidentified, youth, found, Panchganga river