Tue, Mar 19, 2019 05:27होमपेज › Kolhapur › बेळगावच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह तिलारीनगर  परिसरात सापडला 

बेळगावच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह तिलारीनगर  परिसरात सापडला 

Published On: Sep 03 2018 11:28PM | Last Updated: Sep 03 2018 11:28PMचंदगड : प्रतिनिधी 

बेळगाव  अन्नपूर्णेश्वरीनगर, येळ्ळूर रोड येथील राहुल शरणाप्पा दिवटगी (वय 27) हा तरुण गेल्या 22 दिवसांपासून गुढरीत्या बेपत्ता होता  त्याचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती या प्रकरणी  बेळगाव टिळकवाडी पोलिसांनी एकाला  ताब्यात घेऊन यातील प्रमुख संशयिताचा शोध सुरु होता. दरम्यान आज या आरोपीला घेऊन बेळगाव पोलीस    तिलारीनगर ता. चंदगड येथील स्वप्नवेल पॉईंट येथे तपासासाठी घेऊन आले असताना राहूलचा मृतदेह एका झाडीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला.

या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अरविंद पठणे यांनी शवविच्छेदन केले राहूलच्या डोक्यात लोखंडी   हातोड्याने  करण्यात आल्याचे सांगितले त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला त्यानंतर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात दिला ,मात्र या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली नाही या प्रकरणाचा तपास बेळगाव पोलिस करत आहेत.

राहुल हा १० ऑगस्टला रात्री ११च्या सुमारास आदर्शनगर लक्ष्मी गार्डनजवळून बेपत्ता झाला होता . टिळकवाडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.  आपला मुलगा राहुलहा  बेपत्ता नसून त्याचे अपहरण झाले आहे. असे सांगत कुटुंबियांनी पोलिसांकडे तपासासाठी तगादा लावला होता. पण, याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे कुटुंबियांनी दाद मागितली होती.

राहुल बेपत्ता झाला त्या दिवशीपासून गायब झालेल्या एका संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकारणीतल मुख्य म्होरक्या फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. राहुलचा घातपात झाल्याच्या शक्यतेने या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एन. देशनूर हे आपल्या सहकाऱ्यांसह तिलरीला आले होते. रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणाचा   तपास सुरू होता

गेल्या २२दिवसापासून राहुलचा मृतदेह दाट गर्द झाडीत पोत्यात बांधून टाकण्यात आला होता, इतके दिवस होऊनही मृतदेह कुजला न्हवता याचे कारण येथे रात्रंदिवस कोसळनारा पाऊस आणि कमालीचा गारठा त्यामुळेच मृतदेह कुजला नाही.