होमपेज › Kolhapur › रंकाळा-ऋणमुक्‍तेश्‍वर तालमीच्या हुल्लडबाजांत हाणामारी

रंकाळा-ऋणमुक्‍तेश्‍वर तालमीच्या हुल्लडबाजांत हाणामारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

केएसए ‘ब’ गट फुटबॉल साखळी स्पर्धेअंतर्गत सोमवारी खेळविण्यात आलेल्या रंकाळा तालीम मंडळ विरुद्ध ऋणमुक्‍तेश्‍वर तालीम यांच्यातील सामन्यानंतर हुल्लडबाजीसह हाणामारीचा प्रकार झाला. समर्थक एकमेकांना भिडले. मैदानात जाऊन हुल्लडबाजांनी समर्थकांसह खेळाडूंनाही हाणामारी केली. यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. याची माहिती समजताच जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने धाव घेऊन हुल्लडबाजांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला. 

कनिष्ठ गट सामन्यानंतर समर्थकांत हाणामारी

केएसए ‘ब’ गट फुटबॉल साखळी स्पर्धेंतर्गत सोमवारी खेळविण्यात आलेल्या रंकाळा तालीम विरुद्ध ऋणमुक्‍तेश्‍वर तालीम यांच्यातील सामन्यानंतर हुल्लडबाजीसह हाणामारीचा प्रकार झाला. दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांना भिडले. मैदानात जाऊन हुल्लडबाजांनी समर्थकांसह खेळाडूंनाही मारहाण केली. यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. याची माहिती समजताच जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने धाव घेऊन हुल्लडबाजांना पांगवले, यामुळे पुढील अनर्थ टळला. 

अनधिकृत खेळाडूबद्दल आक्षेप

दरम्यान, रंकाळवेस तालीम मंडळाच्या संघातून एक अनधिकृत खेळाडू खेळविण्यात आल्याचा आरोप ऋणमुक्‍तेश्‍वर संघाकडून करण्यात आला. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ गटातील स्पर्धेवेळी महाराष्ट्र पोलिस संघाकडून खेळलेला अक्षय विजय व्हरांबळे हा खेळाडू रंकाळवेस तालीम मंडळातून ‘ब’ गटासाठी खेळल्याबद्दल आक्षेप नोंदविण्यासाठी ऋणमुक्‍तेश्‍वरच्या समर्थकांनी केएसएच्या कार्यालयात गर्दी केली होती. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या लेखी तक्रारीमुळे स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर न झाल्याने बक्षीस समारंभ होऊ शकला नाही. यामुळे कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात जाणारे दोन संघ कोणते? याबाबत फुटबॉलप्रेमींची उत्सुकता कायम आहे. 

 फुटबॉल म्हणजे हुल्‍लडबाजी समीकरण 

छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामने म्हणजे हुल्लडबाज समर्थकांचा दंगा, फुटबॉलप्रेमी व खेळाडूंना मारहाण, पंचांना शिवीगाळ आणि संयोजकांना नाहक त्रास असेच जणू समीकरण निर्माण झाले आहे. खेळाशी देणे-घेणे नसलेले हुल्लडबाज मैदानात दारू-गुटखा-मावा खाऊन बिनधास्त हुल्लडबाजी करतात. एवढ्यावर न थांबता पंच व स्पर्धा संयोजकांना, प्रतिस्पर्धी संघातील समर्थकांपासून खेळाडूंपर्यंत मारहाण केली जाते. मैदानाबाहेरील सर्वसामान्य लोकांनाही या हुल्लडबाजीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हुल्लडबाजांकडून सार्वजनिक आणि सर्वसामान्यांच्या खासगी मालमत्तेचे, वाहनांचे  नुकसान केले जाते. पोलिस प्रशासनाकडून वारंवार इशारा देऊनही लोकप्रतिनिधींकडून हुल्लडबाजांना पाठीशी घालण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप फुटबॉलप्रेमींतून होत  आहे. 

व्यावसायिकतेला खीळ 

कोल्हापूरच्या शतकी फुटबॉल परंपरेची दखल घेऊन अनेक राजकीय पक्ष, क्रीडाप्रेमी संस्था-संघटना यांच्याकडून फुटबॉल संघांसह खेळाडूंच्या करिअरसाठी व्यावसायिक फुटबॉलची तयारी दर्शविली आहे. फुटबॉलला भक्‍कम आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, याचा फायदा घेण्याऐवजी तालीम-मंडळांबद्दलचा पोकळ अभिमान बाळगून हुल्लडबाजीला खतपाणी घातले जात आहे. हे रोखण्यासाठी केएसएकडून ठोस आणि तातडीच्या उपाययोजना व्हाव्यात, अशी माफक अपेक्षा फुटबॉलप्रेमींतून व्यक्‍त होत आहे. याकरिता प्रत्येक सामन्यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिसांकडे पाठवून हुल्लडबाजांवर कारवाईसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही होत आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, The atmosphere, very tense, kolhapur Football, Shahu Stadium, Football Match


  •