Tue, Jan 22, 2019 05:33होमपेज › Kolhapur › उद्यापासून पुन्हा ‘टेक ऑफ’

उद्यापासून पुन्हा ‘टेक ऑफ’

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:39AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेली कोल्हापूरची विमानसेवा मंगळवार, तीन जुलैपासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती खा. धनंजय महाडिक यांनी दिली.

अचानक कोल्हापूरची विमानसेवा बंद झाल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. खा. धनंजय महाडिक यांनीही एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा बंद केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर शनिवारी खा. धनंजय महाडिक यांनी थेट नवी दिल्ली गाठली आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत एअर डेक्कन कंपनीच्या अधिकार्‍यांनाही पाचारण करण्यात आले.

कोल्हापूर-मुंबई, नाशिक-मुंबई आणि जळगाव-मुंबई या मार्गावरची हवाई वाहतूकसेवा अचानक बंद केल्याबद्दल खा. महाडिक यांनी, एअर डेक्कन कंपनीच्या अधिकार्‍यांना जाब विचारत, कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याचा आग्रह धरला. कंपनीच्या नेमक्या अडचणींची माहिती घेऊन, या अडचणी सोडवण्याबाबत खा. महाडिक यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे मंगळवार, तीन जुलैपासून पुन्हा कोल्हापूर-मुंबई मार्गावरील एअर डेक्कनची विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे.