Fri, Apr 26, 2019 09:42होमपेज › Kolhapur › विद्यापीठात तेरा हजार वृक्ष लागवड

विद्यापीठात तेरा हजार वृक्ष लागवड

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत रविवारी  शिवाजी विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांची लागवड करण्यात आली.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. 

विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आदींसह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य वन संरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील आदींसह अनेक शासकीय अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

क्रीडा संकुल परिसरातही वृक्षारोपण 

विद्यापीठाच्या क्रीडा संकुल परिसरात जांभूळ व पिंपळ वृक्षांची लागवड कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए. एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिसभा सदस्य यशवंत भालकर, डॉ. संजय जाधव, डॉ. एन. बी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक उपस्थित होते.

वृक्ष जगण्याचे प्रमाण 90 टक्के

गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाने हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत शिवाजी विद्यापीठाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. लावलेल्या वृक्षाचे जगण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांची जोपासना करण्याच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठाचा लौकिक आहे.