Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Kolhapur › टोप ग्रामपंचायतीचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

टोप ग्रामपंचायतीचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

टोप (ता. हातकणंगले) येथील खणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने टोप ग्रामपंचायतीचे अपील फेटाळले. राष्ट्रीय हरित लवादाने टोप येथील साडेसोळा एकर जागेवर महापालिकेने लँडफील साईट डेव्हलप करण्यासाठी परवानगी दिली होती. त्या आदेशाला टोप ग्रामपंचायतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या निकालाने टोपजवळील तब्बल साडेसोळा एकर जागेवर असलेल्या दोन खणीत लँडफील साईट डेव्हलप करण्याचा महापालिका प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने राज्य शासनाने लँडफील साईट डेव्हलप करण्यासाठी 2008 मध्ये टोप येथील साडेसोळा एकर जागा महापालिका प्रशासनाला दिली होती. परंतु, टोप ग्रामपंचायतीने त्यावर आक्षेप घेत लँडफील साईट डेव्हलप करण्यास विरोध दर्शविला होता. न्यायालयीन लढाही सुरू केला होता. राष्ट्रीय हरित लवादाकडे खटला चालल्यानंतर लवादाने सुनावणी पूर्ण झाल्यावर मनपाच्या बाजूने निकाल दिला होता.