Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Kolhapur › तीन सख्ख्या बहिणींची पोलिस दलात एंट्री!

तीन सख्ख्या बहिणींची पोलिस दलात एंट्री!

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:17PMकोल्हापूर : विजय पाटील

लीना अत्यंत आक्रमक स्वभावाची. तिचा आवाज समोरच्याच्या अंगात कापरं भरवणारा असा. ग्लोरी आणि बेला एकाच प्रकृतीच्या. शांत; पण चाणाक्ष अशा. तिघीही सख्ख्या बहिणी. एकाच दिवशी जन्मलेल्या. तिघीही आयाळधारी सिंहासारख्या रुबाबदार. जर्मन शेफर्ड जातीची ही तिन्ही श्‍वान कोल्हापूर पोलिस दलाची शान वाढवण्यासाठी सज्ज झाली आहेत. लीना अमली पदार्थ शोधण्यासाठी, तर ग्लोरी व बेला या बॉम्ब शोधण्यासाठी पोलिसांना मदत करणार आहेत. 

पोलिस दलात श्‍वान पथकाला कमालीचे महत्त्व आहे. कोणत्याही किचकट गुन्ह्याच्या तपासाची दिशा श्‍वानांमुळे स्पष्ट होते. बॉम्बस्फोटासारखे प्रकार श्‍वानांमुळे टाळता येतात. तंत्रज्ञानाच्या आजच्या जमान्यातसुद्धा श्‍वान पथकाचे महत्त्व मोठे आहे. 

सध्या पोलिस दलात सात श्‍वान आहेत. यामध्ये लीना, ग्लोरी व बेलाचा रुबाब मात्र वेगळाच आहे. कारण, नुकतेच या तिघींना एकाच दिवशी जबाबदारी सोपवण्यात 
आली आहे. या तीघीही आता गुन्हेगारांचा माग काढून त्यांचा कर्दनकाळ बनणण्यास सज्ज झाल्या आहेत.

लीना, ग्लोरी व बेला

 किलकिले डोळे उघडूृन जगाकडे पाहणा-या पंधरा दिवसांच्या तीन पिल्लांना कोल्हापूर पोलिस दलाने विकत घेतले.
 ही तीन्ही पील्ले इचलकरंजीतील आहेत. पंधरा दिवसांपासून आतापर्यंतच्या पोलिस कर्मचा-यांनी त्यांची ममत्वाने काळजी वाहिली आहे. सध्या या तीन्ही पीलांचे वय 1 वर्षे 1 महिने इतके आहे. मध्यप्रदेश (ग्वाल्हेर) येथे सहा महिन्यांचे अत्यंत खडतर असे प्रशिक्षण घेऊन ही तीन्ही जाबाँज श्‍वान पोलिस दलात काम करण्यास आता सज्ज झाले आहेत. लीना ही अंमलीपदार्थ शोधक आहे. तर ग्लोरी व बेला या दोघी बॉम्बशोधक पथकासाठी आहेत. यापुढे पोलिस दलात या तीघी बहिणी दहा वर्षे काम करणार आहेत. 

... असा आहे दिनक्रम
 प्रत्येकीसाठी दोन पोलिस आहेत. एक हँडलर व त्यांचा मदतनीस असा स्टाफ आहे. या तीघी भल्या पहाटे उठतात. रोज सकाळी दोन तास पोलिस मैदान किंवा विमानतळ किंवा कंदलगाव मोकळा माळावर यांचा दोन तास सराव केला जातो. यानंतर त्यांचा मसाज केला जातो. मग त्यांनाडॉक्टरांनी ठरवून दिल्याप्रमाणे खाणा देतात. यानंतर त्यांच्या आरामगृहात विश्रांतीसाठी ठेवले जाते. दुपारी पून्हा तीनच्या सुमारास त्यांचा पून्हा सराव घेतला जातो. यानंतर त्यांच्या शरिराची सफाई केली जाते. यानंतर त्यांना  पून्हा खाणा देऊन विश्रामगृहात ठेवले जाते. या श्‍वांना चोवीस तास सतर्क ठेवले जाते. कॉल आला की हॅन्डलर त्यांना घटनास्थळी तत्काळ घेऊन जातात. 

या जातीचे लागतात श्‍वान

लॅब्रोडर, जर्मन शेफर्ड व डाबरमॅन या जातींचे श्‍वान पोलिस दलात शक्यतो वापरले जातात. यामध्ये गुन्हे शोधासाठी शक्यतो डॉबरमॅन श्‍वान वापरले जातात. कारण ते चपळ असतात. तर बॉम्बशोधक पथकासाठी लॅब जातीचे श्‍वान वापरले जातात. कारण त्यांची घाणेंद्रीये अतीसुक्ष्म असतात. त्यांना कसलाही वास क्षनार्धात कळतो. तर जर्मन शेफर्ड जातीचे श्‍वान सर्वच आघाड्यांवर वापरले जातात. कारण त्यांच्याकडे सर्वच क्षमता असतात.