Mon, Sep 24, 2018 11:58होमपेज › Kolhapur › शिरोळ : तेरवाड बंधारा पाण्याखाली; शेतकऱ्यांचा मार्ग बंद

शिरोळ : तेरवाड बंधारा पाण्याखाली; शेतकऱ्यांचा मार्ग बंद

Published On: Jun 27 2018 12:24PM | Last Updated: Jun 27 2018 12:24PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तेरवाड ता.शिरोळ येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. सलग दोन दिवसत संसतधार सुरू असणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुट वाढली आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तेरवाड बंधाऱ्यावर 3 फुटाने पाहू पाणी वाहू लागले.

तेरवाड बंधारा पाण्याखाली गेल्याने शिरढोण परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचा मार्ग बंद झाला आहे. नदी काठावर असणाऱ्या विजेच्या मोटारी व वीज पंप काढण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरू आहे. कुरणातील गवत ही पाण्याखाली जात असल्याने गवत कापणीचे कामही सुरू आहे.