Thu, Apr 25, 2019 16:23होमपेज › Kolhapur › नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी दहा हजार रुपयांची मदत

नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी दहा हजार रुपयांची मदत

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 05 2018 12:00AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

बंदमध्ये समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत ज्या फेरीवाले तसेच रिक्षा चालकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी शहर शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आ. राजेश क्षीरसागर यांनी केले. या दगडफेकीत दवाखाने, बँका, तसेच फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षा चालक यांचे मोठे नुकसान झाले. फेरीवाले व रिक्षा चालकांचे हातावरचे पोट असते. दगडफेकीत ज्यांचे आर्थिक नुकसान झाले, अशा फेरीवाले व रिक्षाचालकांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.

दरम्यान, महापालिकेसमोरील मंडई व्यापारी ग्रुपने  दहा हजार रुपयांची मदत गोळा करून नुकसान ग्रस्तांना मदत देण्यासाठी आ. क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केले.  समाजकंटकांना रोखण्यासाठी क्षीरसागर यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले. यावेळी अमर क्षीरसागर, अजित कारंडे, अनंत नासिपुडे, अमित बेंडके, दिनेश कापडीया, विपूल मूग, अश्रफभाई बारवावाला आदी उपस्थीत होते.