Mon, Nov 19, 2018 21:06होमपेज › Kolhapur › नेमबाजी वर्ल्डकपमध्ये तेजस्विनीला सुवर्णपदक

नेमबाजी वर्ल्डकपमध्ये तेजस्विनीला सुवर्णपदक

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 24 2018 1:21AMकोल्हापूरची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने यंदाच्या सत्रातील बहारदार कामगिरी कायम राखत जर्मनीतील म्युनिच येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ रायफल/पिस्तूल विश्‍वचषकात सुवर्णपदकाचा वेध घेतला. 50 मी. रायफल प्रोन प्रकारात तेजस्विनीने 621.4 इतक्या गुणांची कमाई केली. भारताच्याच अंजुम मुदगिलने 621.2 गुणांसह रौप्य जिंकले. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तेजस्विनीने रायफल थ्री पोजिशन प्रकारात स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.