Fri, Apr 19, 2019 08:04होमपेज › Kolhapur › माध्य. शिक्षकांचे पगार तीन दिवसात होणार

माध्य. शिक्षकांचे पगार तीन दिवसात होणार

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:56AMनानीबाई चिखली : वार्ताहर 

पुणे येथे धरणे आंदोलन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठला माध्यमिक  शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तातडीने चर्चेसाठी बोलावले. या बैठकीत मार्चअखेर जिल्ह्यातील सर्व  माध्यमिक शिक्षक व कर्मचार्‍यांचे  थकीत वेतन देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत प्रलंबित पगार होणार आहे.

अतिरिक्त समायोजनसंदर्भात मुख्याध्यापकांचे थकलेले वेतन संचालकांच्या मान्यतेनंतर जानेवारी 2018 अखेरपर्यंतचा पगारसुद्धा जमा होणार असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. अशैक्षणिक कामे व शालेय पोषण आहाराबाबतच्या  विविध प्रश्‍नांबाबत प्राथमिक विभागाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे यावेळी निश्‍चित केले. ऑनलाईन कामे शिक्षकांनी न करता लिपिकामार्फत करावीत, वेतन पथकाच्या दुर्लक्षामुळे रखडलेल्या 20 टक्के अनुदानाबाबत त्रुटी पूर्तता  करण्यासंबंधीचा निर्णयही झाला. तसेच उच्च माध्यमिकचे प्रस्ताव या आठवड्यातच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, उदय पाटील, डॉ. ए. एम. पाटील, बी. बी. पाटील, बी. डी. पाटील, मिलिंद बारवडे आदी उपस्थित होते. सी. एम. गायकवाड यांनी आभार मानले.