Sun, Feb 17, 2019 05:30होमपेज › Kolhapur › मूल होत नसल्याने शिक्षकाच्या पत्नीची गळफासाने आत्महत्या

मूल होत नसल्याने शिक्षकाच्या पत्नीची गळफासाने आत्महत्या

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 10 2018 12:19AMबाजारभोगाव : वार्ताहर

लग्‍नाला दहा वर्षे होऊनही मूल न झाल्याने निराश झालेल्या कोमल विजय शिंगारपुतळे (वय 27, मूळ रा. बामणी, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. बाजारभोगाव, ता. पन्हाळा) या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

विजय रावसाहेब शिंगारपुतळे जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक   शाळेत शिक्षक  आहेत. जून महिन्यात त्यांची चंदगड तालुक्यातून कोलिक (ता.. पन्हाळा) येथे बदली झाली. दोघे पती-पत्नी बाजारभोगावमधील केदारी कोले यांच्या घरी भाड्याने राहण्यास आले. रविवारी सकाळी पती विजय  कोल्हापूरला गेले होते. सायंकाळी  परत आले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी पत्नीला हाक मारली,  प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडून  प्रवेश केला असता, कोमल यांनी छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.