Mon, Nov 19, 2018 16:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : विद्यार्थिनीला उठाबशा; शिक्षिकेला अटक

कोल्हापूर : विद्यार्थिनीला उठाबशा; शिक्षिकेला अटक

Published On: Dec 14 2017 2:40PM | Last Updated: Dec 14 2017 2:40PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

आठवीतील विद्यार्थिनीला किरकोळ कारणावरून ५०० उठाबशाची शिक्षा देणार्‍या चंदगडच्या मुख्याध्यापिका अश्‍विनी देवण यांना अखेर अटक करण्यात आली आहे. देवण यांच्यावर यापूर्वीच वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी वेतन रोखण्याचे निर्देश दिले असून, आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होणार आहे. 

चंदगड येथील भावेश्‍वरी संदेश विद्यालयात आठ दिवसांपूर्वी आठवीत शिकणार्‍या विजया निवृत्ती चौगले मुलीला हिंदीची वही आणली नाही, या कारणास्तव ५०० बैठका मारण्याची शिक्षा केली होती. ३०० पर्यंत बैठका मारल्यानंतर या मुलीच्या पायात कळा येऊ लागल्या. तशा परिस्थितीतही विजया हिने चंदगडपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या काळगोंडवाडी येथील घरी पायी प्रवास केला. विजया ही रोज चार किलोमीटरचा प्रवास करूनच शाळेत येते. घरात आल्यानंतर तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला गडहिंग्लजमधील रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांपासून तिला कोल्हापुरात सीपीआरमध्ये हलवण्यात आले आहे. येथे आल्यानंतरही तिच्या त्रासात वाढ झाली आहे. पायात असह्य कळा येत आहेत.

याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापिका अश्‍विनी देवण यांचे निलंबन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे चंदगडचे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्‍लाळ यांनी सांगितले.