Wed, Jan 16, 2019 19:45होमपेज › Kolhapur › 50 हजारांची लाच घेताना कोथळीचा तलाठी जाळ्यात

50 हजारांची लाच घेताना कोथळीचा तलाठी जाळ्यात

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

कोथळी (ता. शिरोळ) येथे जमिनीला सहहिस्सेदार म्हणून पत्नीचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच स्वीकारताना गावकामगार तलाठी सदाशिव धोंडिराम निकम (वय 47) हा त्याच्या दानोळी येथील घरी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकला. निकम हा  शिरोळ तालुका तलाठी-मंडल अधिकारी संघटनेचा अध्यक्ष आहे.

तक्रारदार यांची कोथळी येथे चार एकर तीन आर. जमीन आहे. या जमिनीमध्ये सहहिस्सेदार म्हणून त्यांच्या पत्नीचेे नाव लावायचे होते.  सर्कल व तहसीलदारांना सांगून नाव लावण्याचे काम करून घेतो, असे सांगून तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी निकम याने केली होती. याबाबत दोन जुलै रोजी लाचलुचपत खात्याकडे तक्रार देण्यात आली होती.

शनिवारी तलाठी निकम यांनी तक्रारदार यांना सायंकाळी फोन करून रक्कम घेऊन दानोळी येथे घरी या, असे सांगितले. त्याप्रमाणे तलाठी सदाशिव निकम याच्याविरुद्ध त्याच्या घरी दानोळी येथे सापळा रचण्यात आला. निकम याने तक्रारदारकडून 50 हजार रुपये लाच स्वीकारली असता, त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.