Sun, Mar 24, 2019 06:20होमपेज › Kolhapur › कमर्शियल बोर्डावर अनधिकृत फलक लावणार्‍यांवर कारवाई करा

कमर्शियल बोर्डावर अनधिकृत फलक लावणार्‍यांवर कारवाई करा

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:05AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कमर्शियल आणि अधिकृत बोर्डावर बळाचा वापर करून परस्पर अनधिकृत डिजिटल फलक लावणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी कोल्हापूर होर्डिंग अँड आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या वतीने शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे केली आली.

 असोसिएशनचे अध्यक्ष संदीप खमितकर, ज्ञानदेव पाटील, अमित सागावकर, किरण शिंदे, माणिक ठाकूर, सुहास सांगवडेकर, सर्जेराव पाटील आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  डॉ. अमृतकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

अधिकृत, कमर्शियल बोर्डावर परस्पर डिजिटल फलक लावण्यासाठी व्यावसायिकांवर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरुद्ध असोसिएशनने तक्रार केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले. 

असोसिएशनमार्फत डिजिटल फलकांच्या अनुषंगाने आचारसंहितेचे तंतोतंत पालक केले जाते. त्यामध्ये गैरमार्गाला अजिबात थारा दिला जात नसतानाही काही विघ्नसंतोषी मंडळी परस्पर डिजिटल फलक लावण्याचा उद्योग करतात. पोलिस यंत्रणा, मनपाच्या परवान्याशिवाय परस्पर डिजिटल फलक लावणार्‍यांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असेही पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पोलिस दलामार्फत शहरासह जिल्ह्यात सुरू केलेल्या अनधिकृत डिजिटल फलक हटाव मोहिमेला असोसिएशनमार्फत  सहाय्य करण्यात येईल, अशीही ग्वाही यावेळी देण्यात आली.