Thu, Jul 18, 2019 06:12होमपेज › Kolhapur › पत्रकार हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा

पत्रकार हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 04 2018 11:57PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. यावेळी माध्यमांच्या कार्यालयांवर हल्ले, प्रतिनिधींना दमदाटीचे प्रकार घडले. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी कोल्हापूर पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. 

या सर्व तणावपूर्ण स्थितीत माध्यमांनी समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बजावलेल्या भूमिकेबद्दल पालकमंत्री पाटील यांनी माध्यमांची प्रशंसा करत नागरिकांना सुरक्षित व शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर, कार्यालयावर हल्ले करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर बंद काळात उद्भवलेल्या परिस्थितीचा पालकमंत्री पाटील यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत आढावा घेतला.

सक्षमपणे पोलिसिंग व्हावे, समुपदेशन संवाद व कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई याद्वारे जनतेत सुरक्षितेबद्दल विश्‍वास वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते आदींसह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.