Thu, Jul 18, 2019 02:42होमपेज › Kolhapur › पोलिस उपअधीक्षक सरवदेंवर कारवाई करा

पोलिस उपअधीक्षक सरवदेंवर कारवाई करा

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:46AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ येथील तरुण राजाराम माने आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे यांना साजरा केलेला कार्यालयातील वाढदिवस महागात पडण्याची शक्यता आहे. आ. उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना ही बाब निदर्शनास आणून थेट कारवाईची मागणी केली आहे.

यावेळी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. राजाराम माने यांनी आत्महत्या केल्यानंतर शिरोळवासीयांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून संशयित आरोपी कॉन्स्टेबल भुजिंगा कांबळे याला निलंबित करण्याची व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सरवदे यांनी केलेल्या वक्तव्याने ते वादग्रस्त ठरले होते. ते सक्तीच्या रजेवर असताना कार्यालयात वाढदिवस साजरा केला. 

आ. उल्हास पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरवदे यांच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी आहेत. सक्तीच्या रजेवर असताना कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याने संतापात भर पडली आहे. त्यांचा कार्यकाळ संपला असतानाही जयसिंगपूर विभागात पुन्हा वर्षाचा सेवाकाळ वाढवून घेतला आहे.