Mon, Apr 22, 2019 16:08होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेल परिसर आरक्षित जागेसाठी 18 कोटींचा टीडीआर

तावडे हॉटेल परिसर आरक्षित जागेसाठी 18 कोटींचा टीडीआर

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरात महापालिकेने आरक्षण टाकलेल्या कचरा डेपो व ट्रक टर्मिनसमधील काही जागेसाठी 18 कोटींचा टीडीआर संबंधितांना दिला आहे. टीडीआर दिल्यानंतर ही जागा महापालिकेच्या मालकीची झाली आहे. तरीही प्रशासनाने जागा ताब्यात घेतलेली नाही. ती जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. तेथे कचरा डेपो व ट्रक टर्मिनस सुरू करावे. प्रत्यक्ष जागेचा वापर न केल्यास महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. 

शेटे म्हणाले, श्रीमती शालाबाई यशवंत कदम व इतर यांच्यातर्फे वटमुखत्यार महावीर शंकर गाट यांनी ई वॉर्ड मौजे उचगाव रि.स.नं. 123 हिस्सा नं. 3 पार्ट आरक्षण ट्रक टर्मिनस क्षेत्र 4,360 चौ.मी. जागेसाठी 4 कोटींचा टीडीआर (डीआरसी नं. 208/2015-16) दिला आहे. किरण श्रीपती जाधव व इतरकरिता महावीर शंकर गाट, ई वॉर्ड मौजे उचगाव, रि.स.नं. 103/ब/1 आरक्षण क्र. 158 ट्रक टर्मिनस क्षेत्र 4,000 चौ.मी. जागेसाठी 3 कोटी 36 लाखांचा टीडीआर (डीआरसी नं. 202/2015-16) दिला आहे. सोनाबाई लाड व इतर तीनतर्फे वटमुखत्यार अतुल विजयकांत मूग, ई वॉर्ड, मौजे उचगाव, रि.स.नं. 123/1/1 आरक्षण क्र. 128 ट्रक टर्मिनस क्षेत्र 4,000 चौ.मी. जागेसाठी 3 कोटी 36 लाखांचा टीडीआर (डीआरसी नं. 201/2015-16) दिला आहे.

सुनील बोधाराम जेवराणी व गणेश खियालदास दर्याणी, ई वॉर्ड, रि.स.नं. 103/ब 1 पार्ट, मौजे उचगाव, आरक्षण क्र. 158 ट्रक टर्मिनस क्षेत्र 7,300 चौ.मी. जागेसाठी 5 कोटी 60 लाखांचा टीडीआर (डीआरसी नं. 223/2016-17) दिला आहे. चंद्रकांत ग. मनाडेकरिता व मु. अतुल वि. मूग, ई वॉर्ड, रि.स.नं. 105/2/1 व 105/3/1 मौजे उचगाव आरक्षण क्र. 157 ट्रक टर्मिनस क्षेत्र 2,800 चौ.मी.साठी 2 कोटी 52 लाखांचा टीडीआर (डीआरसी नं. 214/2016-17) दिला आहे, असेही शेटे यांनी सांगितले.  

Tags : Kolhapur, TDR, 18, crores, Tawde Hotel, premises, reserved, place