Tue, Apr 23, 2019 14:17होमपेज › Kolhapur › कोल्हापूर: महापौरपदी स्वाती यवलुजे, उपमहापौरपदी सुनील पाटील

कोल्हापूर: महापौरपदी यवलुजे, उपमहापौरपदी पाटील

Published On: Dec 22 2017 11:55AM | Last Updated: Dec 22 2017 11:58AM

बुकमार्क करा

कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

कोल्हापुरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत  काँग्रेसच्या स्वाती यवलुजे या विजयी झाल्या. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांचा विजय झाला. शुक्रवारी झालेल्या महासभेत यवलुजे यांना  48 इतकी मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभारलेल्या भाजपच्या मनीषा कुंभार यांना 33 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सुनील पाटील यांना देखील 48 मते मिळाली. तर ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. 

पालिकेच्या सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांची निवड निश्चित मानली जात होती. निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी व्हिप जारी केला होता.

पालिकेत काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 15, ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 14 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. महापौर , उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.