Sun, Jul 21, 2019 16:29
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › स्वाती शिंदेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड

स्वाती शिंदेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:23AMमुरगूड : प्रतिनिधी

येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची राष्ट्रीय मल्ल स्वाती संजय शिंदे हिची महाराष्ट्रातून आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. स्वाती शिंदेने जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजन गटातून सुवर्णपदक पटकावले.

या कुस्ती संकुलची मल्ल प्रतीक्षा संजय देवा हिने 59 किलो वजन गटातून कांस्य पदक मिळविले. कु. स्वाती शिंदेने या स्पर्धेत प्रेक्षणीय व चटकदार कुस्त्या केल्या. तिने हरियाणाची कु. अंजू, उत्तर प्रदेशची आरजू व अर्चनाला चितपट केले. मंडलिक कुस्ती आखाड्याच्या प्रतीक्षा देवा हिने पंजाबच्या मनजीतला व दिल्लीच्या मंजूला पराभूत केले, तर अंतिम लढतीत हरियाणाच्या सृष्टीला ढाक डावावर चितपट केले.

स्वाती शिंदे हिने सुवर्ण पदक विजेती किरण (हरियाणा) हिला भारद्वाज डावावर पराभूत केले. त्यामुळे ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. या दोन्ही यशस्वी मल्लांना कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांचे मार्गदशन मिळाले, तर जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी संजय मंडलिक, संचालक वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, वस्ताद सुखदेव येरूडकर यांचे प्रोत्साहन मिळाले.