Thu, Jun 20, 2019 21:19होमपेज › Kolhapur › स्वाती शिंदेची ज्युनियर आशियाई कुस्तीसाठी भारतीय संघात निवड

स्वाती शिंदेची ज्युनियर आशियाई कुस्तीसाठी भारतीय संघात निवड

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मुरगूड येथील महिला कुस्तीगीर पै. कु. स्वाती शिंदे हिची ज्युनियर आशियायी कुस्ती स्पर्धेसाठी आज भारतीय संघातून निवड झाली. 53 किलो वजनी गटात तुल्यबळ कुस्त्या जिंकत तिने हे यश मिळवले. तिच्या वजनी गटात एकूण 7 मुलींपैकी 6 हरियाणा राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर होत्या. महाराष्ट्राची निवड झालेली स्वाती शिंदे ही एकमेव महिला कुस्तीगीर होती.

पहिल्या कुस्तीत पुढे चाल मिळाल्यानंतर दुसर्‍या लढतीत तिने हरियाणाच्या मीनाक्षीवर 43 सेकंदात झोळी डावावर विजय मिळवला. तिसर्‍या व अंतिम लढतीत हरियाणाच्या मंजू वर 6 - 2 ने विजय मिळवत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.

17 ते 23 जुलै 2018 दरम्यान दिल्ली येथे ज्युनियर आशियाई स्पर्धा होणार आहेत. मातृभूमीत होणार्‍या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूरज कोकाटे व विपुल थोरात यांनी काल निवड चाचणी यशस्वी केली तर आज महिला कुस्तीत स्वातीच्या कामगिरीने महिला कुस्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. स्वाती लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती केंद्राची कुस्तीपटू आहे.