होमपेज › Kolhapur › स्केटिंग रॅलीतून स्वच्छ भारत, बेटी बचाओ संदेश

स्केटिंग रॅलीतून स्वच्छ भारत, बेटी बचाओ संदेश

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ...’, ‘लेक वाचवा...’ यासह ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत...’, ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनास शुभेच्छा...’, ‘कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे...’ अशा विविध विषयांवरील फलकांसह स्केटिंगपटूंनी सोमवारी कोल्हापूर शहरात जनजागृती केली. निमित्त होतं अमृतमहोत्सवी दैनिक ‘पुढारी’च्या 79 व्या वर्धापनदिनाचे.

कोल्हापूर जिल्हा हौशी रोलर स्केटिंग संघटना, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र आणि जुना बुधवार पेठेतील कदम परिवाराच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘शुभसंदेश’ स्केटिंग रॅली काढण्यात आली. यंदा रॅलीचे 40 वे वर्ष होते. यानिमित्ताने बालचमूंनी खाऊच्या पैशातून बचत केलेला निधी बालकल्याण संकुलासाठी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. 

ऐतिहासिक बिंदू चौकातून रॅलीची सुरुवात माजी नगरसेवक पांडुरंग इंगवले, तौफीक कोतवाल आणि सुहास जाधव यांच्या हस्ते झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ येथे आली. याठिकाणी रॅलीचे स्वागत नूतन महापौर सौ. स्वाती यवलुजे व दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केले. यावेळी अ‍ॅड. धनंजय पठाडे, माजी नगरसेवक दत्तात्रय इंगवले, जयेश ओसवाल, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, प्रशिक्षक महेश कदम, भास्कर कदम व तेजस्विनी कदम आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यानंतर बालचमूंनी ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.  दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव व राजवीर आणि तेजराज जाधव यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. स्पेश ऑलिम्पीक भारत स्पर्धेत दोन कांस्य पदकांची कमाई करणार्‍या ओम जगताप याचा विशेष सत्कार महापौर स्वाती यवलुजे व संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. 

स्केटिंग रॅलीत किरण शंकर हराळे, सारंग व श्रेयस गोपुकुमार, पृथ्वीराज परशराम फाळके, यशस्वीनी सुजय पवार, सुबहान तौफिक कोतवाल, नोमान असिफ कोतवाल, हिबा जावेद कोतवाल, सैफ समिर सरगुर, हितेन राजेंद्र सरनाईक, अवनि राजेंद्र कदम, साईश राम शिर्के, धीरज शरद पाटील, हरिष उमेश लाटकर,  प्रवीण तुकाराम बोटे, अहमद शकुर रईस, खुशी शरद थडके, बिलाल वसिम शेख, इरफाज अझरुद्दीन शेख, पार्थ सुहास जाधव, यश भिकू कांबळे, समृद्धी शरद पाटील, हिबा व जिशान परवेज बागवान या स्केटिंगपटूंसह सौ. उज्ज्वला हराळे, मीनाक्षी गोपुकुमार, सौ. शिल्पा फाळके, समृद्धी पवार, तौफिक कोतवाल, समिर सरगुर, राजेंद्र सरनाईक, संपदा सरनाईक, इंद्रायनी कदम, श्‍वेता शिर्के, पाकिजा अब्दूल शकुररईस, जयाराणी शरद थडके, वसिम अंंजूम शेख, नासिया आझरुद्दीन शेख, सुहास सुरेश जाधव, समद सरफराज बागवान, ओम व हर्षवर्धन मेघशाम जगताप, रुग्वेद जाधव, फबिया सरगुर, साकिद रेटरेकर, अब्दूला व हुमेरा जावेद कोतवाल, निहाल आसिफ कोतवाल, हर्षदा जगताप, सौ. आरती जगताप, अफसरा सरगुर पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

संयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, भास्कर कदम, तेजस्वीनी कदम, धनश्री कदम, विरश्री कदम, देवेंद्र कदम, मोरेश्‍वर कदम आदींनी केले.