Wed, Apr 24, 2019 21:58होमपेज › Kolhapur › खंडणीप्रकरणी हवालदार निलंबित

खंडणीप्रकरणी हवालदार निलंबित

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन आठ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील हवालदार अनिल चव्हाण (रा. जयसिंगपूर) याला शनिवारी निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही कारवाई केली.

निलंबित हवालदाराच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना देण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण कवाळे (रा. आरग, ता. मिरज)  यांच्याकडून चार लाख रुपये उकळून पुन्हा आठ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील वैभव खामकर, विकी खामकरसह हवालदार अनिल चव्हाणविरुद्ध जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे.