Fri, Jul 19, 2019 07:33होमपेज › Kolhapur › तीन लाख रु. वाटमारीतील संशयित सीसीटीव्हीत कैद

तीन लाख रु. वाटमारीतील संशयित सीसीटीव्हीत कैद

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:41AM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर येथे शुक्रवारी बॅग हिसडा मारून तीन लाख रुपये वाटमारी प्रकरणातील संशयित दोन आरोपी बँक परिसर व बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. त्यांचे चेहरे सुस्पष्टपणे दिसत आहेत. फिर्यादी गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वर्णन मिळतेजुळते आहे. अंगावर काळा शर्ट व जीन पॅन्ट असा पेहराव आहे. सांगली, मिरज शहर व परिसरातही हे आरोपी वॉन्टेड आहेत. परराज्यातील चोरटे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

शुक्रवारी सकाळी सव्वाबाराच्या सुमारास चंद्रकांत गणपती गुजर (वय 59) हे 9 व्या गल्लीतील बँक ऑफ इंडियातून दोन लाख तर 8 व्या गल्लीत राम मंदिराजवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून एक लाख रूपये काढले होते. तीन लाख रुपये असलेली बॅग अ‍ॅक्टिव्हा मोपेडच्या डिकीतून काढून ते शाहूनगरातील घरात प्रवेश करीत असताना चोरट्यांनी बॅग हिसडा मारून मोटारसायकलवरून पसार झाले  आहेत.