Sun, Jun 16, 2019 12:24
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › थकीत कर्जदारांना सरचार्ज वसुलीत दिलासा

थकीत कर्जदारांना सरचार्ज वसुलीत दिलासा

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 07 2018 11:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी

एकदा कर्ज थकले की, मग संस्था असो किंवा बँक, थकबाकी वसुलीच्या नावावर विविध प्रकारचे खर्च टाकून कर्जदाराला जेरीला आणण्याचे प्रकार घडत आहेत.  यातून कर्जदाराला दिलासा देणारा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. यामध्ये थकीत कर्ज वसुलीसाठी 1.5 (दीड) टक्क्यावर सरचार्जची आकारणी करावयाची नाही, असे आदेश काढले आहेत. यातून जर एखाद्या वसुली अधिकार्‍याने पूर्वीप्रमाणे सरचार्जची आकारणी केल्यास त्याच्यावर कारवाई  होणार आहे.  

कर्जवसुली करण्यासाठी सहकार खात्याने काही नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये कर्जाच्या वसुलीला गेल्यानंतर एखाद्या कर्जदाराकडून थकीत रकमेपोटी जेवढी रक्‍कम वसूल होईल, त्याच्या रकमेवर सहा टक्के सरचार्ज आकारणीला परवानगी होती. पण, संस्थेतील अधिकारी व कर्मचारी आपली पोळी भाजण्यासाठी त्या कर्जदाराच्या एकूण थकीत रकमेवर  सहा टक्के सरचार्जची आकारणी करत होत्या, त्यामुळे कर्जदाराने कर्जापोटी वसुली अधिकार्‍याकडे जेवढी रक्‍कम जमा केली असेेल ती त्याच्या कर्जातून वजा न होता उलट वसुलीच्या खर्चात त्या रकमेची वजावाट होऊन मूळ कर्ज वाढतच राहत असे, सहकार विभागाच्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली, यामुळे अशा प्रकरणांना चाप लावण्यासाठी सहकार विभागाने थकीत कर्जवसुलीसाठी सरचार्ज आकारणीचे नवीन नियम नियमावली केली आहे.  

Tags : Kolhapur, Surge, Deducted, Overseas, Borrowers