Thu, Jun 20, 2019 21:32होमपेज › Kolhapur › सिद्धगिरी कारागिरी विद्यापीठासाठी प्रयत्न करू

सिद्धगिरी कारागिरी विद्यापीठासाठी प्रयत्न करू

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 15 2018 11:58PMउजळाईवाडी : प्रतिनिधी

देश आणि देशाची संस्कृती टिकली पाहिजे या उद्दात्त हेतूने अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामीजींनी सिद्धगिरी कारागिरी महाकुंभचे भव्य दिव्य आयोजन केले. या उपक्रमातून खर्‍या अर्थाने लुप्त होत चाललेल्या श्रमशक्तीचा गौरव करून नवी दिशा देण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन आ. सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त करत सिद्धगिरी कारागीर विद्यापीठ स्थापन करण्यास शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही दिली.

कणेरी (ता.करवीर) येथील सिद्धगिरी कारागीर महाकुंभ 2018 च्या सांगता समारंभात आ. हाळवणकर बोलत होते. लखपती शेती मॉडेल हे शेतकर्‍यांच्या शेतीविषयी आत्मविश्‍वास वाढवण्यासारखे आहे. मठावरील लखपती शेतीचे मॉडेल असो अथवा हॉस्पिटल सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत.

सिद्धगिरी मठाच्यावतीने ‘शेड नेट’ द्वारे सेंद्रिय भाजीपाला कोल्हापूर शहरात पुरविण्यात येणार असून सध्या 14 लोकांना शेड नेट दिले आहेत.

‘होय, मी मंत्र्यापेक्षा  महामंत्री’
आ. सुरेश हाळवणकर यांनी माजी मंत्री अण्णा डांगे यांच्याकडे पाहत अण्णा जनसंघात होते, त्यामुळे मी जरी मंत्री नसलो तरी पक्षाचा महामंत्री आहे, असे सांगितले.
यावेळी हिंदुराव शेळके, सुरेश पाटील, प्रताप कोंडेकर, बसवराज पाटील, बसवप्रसाद जोल्ले, योगेश प्रभू, बसंतलाल आदी उपस्थित होते.