Sat, Jul 20, 2019 13:10होमपेज › Kolhapur › प्रियकराच्या छळाला कंटाळून अकिवाट येथे महिलेची आत्महत्या

प्रियकराच्या छळाला कंटाळून अकिवाट येथे महिलेची आत्महत्या

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:14AMकुरूंदवाड : प्रतिनिधी

अकिवाट (ता. शिरोळ) येथे प्रियकराच्या मारहाण व छळाला कंटाळून प्रियांका बापू चिंचवाडे (वय 28, रा. अकिवाट) हिने प्रियकराच्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद सोमवारी बापू पारिसा चिंचवाडे (रा. अकिवाट) यांनी कुरूंदवाड पोलिसांत दिली आहे. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, सुरेश अशोक लगमावर (रा. अकिवाट) या प्रियकरास पोलिसांनी अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता, त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

प्रियांकाचा आठ वर्षांपूर्वी सचिन उपाध्ये (रा.कल्लोळ, ता. चिक्कोडी) यांच्याशी विवाह झाला होता. गेल्या आठ महिन्यांपासून प्रियांका पतीला सोडून प्रियकर अशोक लगमावर याच्यासोबत त्याच्या घरी अकिवाट येथे राहत होती. अशोकने प्रियांकाचे सोन्याचे दागिने विकून दारू पिऊन पैसे संपवले होते. यानंतर तू कामाला जा आणि मला पैसे आणून दे, असे अशोकने तिला सांगितले होते. अशोक सतत पैशाची मागणी करत शिवीगाळ, मारहाण करत असल्याने या छळाला कंटाळून प्रियांकाने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.