Fri, Jul 10, 2020 09:07होमपेज › Kolhapur › ऊसदर तोडगा वाटाघाटी फिस्कटल्या; पुन्हा 25 नोव्हेंबरला बैठक

ऊसदर तोडगा वाटाघाटी फिस्कटल्या; पुन्हा 25 नोव्हेंबरला बैठक

Last Updated: Nov 17 2019 1:26PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाइन

साखरेला उठाव नसल्याने साखर कारखाने प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे एफ आर पी दोन तीन टप्प्यात घ्यावी अशी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. एकरकमी एफआरपी सह जादाची किती रक्कम देणार अशी मागणी संघटनेने केली. आज शासकीय विश्रामगृह येथे ऊसदराच्या तोडण्याबाबत बैठकित अंतिम निर्णय झाला नाही.23 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाल्यानंतर 25 नोव्हेंबरला पुन्हा ऊसदराबाबत बैठक घेण्याचे ठरले. दरम्यान जिल्ह्यात एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही. सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष असल्याचा इशारा स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी आणि अधिक जा रक्कम देण्याच्या मागणी करण्यात आली होती. यावेळी कारखानदारांकडून सतेज पाटील यांनी सध्या साखर उद्योग संकटात आहे. तसेच राज्य बँकेकडून कारखानदार कर्जाची मागणी करत आहोत. जिल्ह्याला पुराचा फटका बसल्याने ऊस क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकरी संघटनांनी थोडी सबुरीने घेण्याची भावना व्यक्त केली.

यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांचे या मागणीला मान्यता दिली नाही. तसेच एफ आर पी चे तुकडे होऊ देणार नाही. 23 रोजी ऊस परिषद होणार आहे. यानंतर 25 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्राम गृहात पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला.

यावेळी आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, पी जी मेढे, राहुल आवाडे, तसेच स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, शैलेश चौगुले, यांच्यासह पदाधकारी आदी उपस्थित होते.