Wed, Aug 21, 2019 15:20होमपेज › Kolhapur › साखर दर तेजीत : क्विंटलला 300 रु. वाढ

साखर दर तेजीत : क्विंटलला 300 रु. वाढ

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखर उद्योगाला बुस्टर डोस देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. याचाच परिणाम म्हणून आज साखरेच्या दरानेही चांगली उसळी घेतली. परवापर्यंत प्रतिक्िंवटल 2700 रुपये असणारा साखरेचा दर आज 3010 रुपयांवर पोहोचला. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता या उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

साखरेचे दर कोसळेलेले आणि मागणीही ठप्प होती. यावर मार्ग काढण्यासाठी साखर उद्योगाकडून काही मागण्या सरकारकडे करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारने गेल्या दोन महिन्यांत मात्र या उद्योगाकडे गांभीर्याने बघण्यास सुरुवात केली. आयात साखरेवरील शुल्क शंभर टक्के करणे, निर्यातीवरील शुल्क रद्द यासारखे निर्णय झाले; पण त्यातूनही फारसे काही निष्पन्न होत नाही, असे लक्षात आल्यानंतर देशातून 20 लाख टन साखर निर्यातीची सक्ती करण्यात आली. त्यानुसार कारखान्यांना कोटाही ठरवून देण्यात आला; पण त्याचाही फारसा परिणाम झाला नाही.

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र साखर प्रतिक्िंवटल 2900 रुपयांपेक्षा कमी दराने विकायची नाही, असा धाडसी निर्णय घेण्यात आला. याशिवाय या उद्योगाला दिलासा देण्यासाठी 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करणे, इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीसाठी कमी व्याजाचे कर्ज देणे यासारखे निर्णय झाले. त्याचा चांगला परिणाम दोन दिवसांतच दिसू लागला आहे. सोमवारपर्यंत साखरेचे दर प्रतिक्िंवटल 2650 ते 2700 रुपये होते. कालपासून मात्र या दरात मोठा वाढ होऊ लागली आहे. आज तर हे दर प्रतिक्िंवटल 3010 रुपयांवर पोहोचले. या दरवाढीने साखर उद्योगाला चांगला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.