Mon, Apr 22, 2019 16:31होमपेज › Kolhapur › साखर आयुक्‍तांना बांगड्यांचा आहेर

साखर आयुक्‍तांना बांगड्यांचा आहेर

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:58PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांनी उसाची मोठ्या प्रमाणात तोड केली आहे. परंतु, एफ.आर.पी. मुदतीत बिले दिलेली नाहीत. 16 डिसेंबर 2017 पासून तोड केलेल्या उसाची बिले न दिलेल्या साखर कारखान्यांवर आयुक्‍तांनी कारवाई केली नाही. या निषेधार्थ ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्‍तांना बांगड्यांचा आहेर दिला.

याबाबत शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 नुसार साखर आयुक्‍त (पुणे) यांनी या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई केली नाही, तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार फौजदारी कारवाई केली नाही म्हणून सोमवारी ‘आंदोलन अंकुश’ने साखर सहसंचालकांना बांगड्यांचा आहेर दिला.

निवेदन व बांगड्यांचा आहेर  साखर आयुक्‍त यांना पाठवावा, अशी मागणी केली आहे. कारण, त्यांनी कायदा न राबवता एफ.आर.पी. न देणार्‍या कारखान्यांची सुनावणी लावून वेळ काढण्याचे कारस्थान केले आहे. याचा निषेध म्हणून त्यांना बांगड्यांचा आहेर पाठवण्यात यावा, अशी विनंती यावेळी कार्यकर्त्यांनी सहआयुक्‍तांना केली.

यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, श्रीधर शेट्टी, दत्ता मोरे, पाटील गुरुजी, अक्षय पाटील, अविनाश पाटील, धनंजय माळी, अनिल माने, विकास शेश्‍वरे, अमर माने यांनी आंदोलन केले.