Wed, Mar 20, 2019 02:49होमपेज › Kolhapur › सार्वजनिक बांधकाममध्येही समुपदेशनाने बदली

सार्वजनिक बांधकाममध्येही समुपदेशनाने बदली

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:04PMकोल्हापूर : सुनील सकटे 

बदली हा सर्वच शासकीय विभागामध्ये परवलीचा शब्द बनला आहे. एप्रिल, मे महिना सुरू झाला की प्रत्येक अधिकारी कर्मचार्‍यांना बदल्यांचे वेध लागतात. मात्र, पारदर्शकतेचा आव आणून जिल्हा परिषदेत सुरू झालेले समुपदेशन धोरण आता सार्वजनिक बांधकाम विभागात राबविण्यात येणार आहे. मात्र, जि. प. तील अनुभव लक्षात घेता या विभागात हे धोरण कितपत पारदर्शकता निर्माण करेल, असा सूर उमटत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता पदापासून वरील पदे म्हणजेच कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता ही वरिष्ठ पदे सोडून उर्वरित सर्व पदांना हे धोरण लागू करण्यात आले आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच काढण्यात आला आहे. या धोरणानुसार प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपल्यास हवी ती दहा ठिकाणे सुचविण्याची तरतूद आहे. मात्र, यापूर्वी काम केलेल्या ठिकाणांचा उल्‍लेख करू नये, असा दंडक आहे. या दहा ठिकाणी जागा रिक्‍त आहेत का याची ऑनलाईन माहिती दाखविण्यात येणार आहे. सुचविण्यात आलेल्या दहा क्रमांकासाठी प्रथम क्रमांकापासून दहा क्रमांकांपर्यंत जागा जिथे रिक्‍त असेल तेथे संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्‍ती असा  ढोबळ धोरण आहे. हे नवे धोरण राबविण्यात या विभागात अडथळ्यांची शर्यत करावी लागणार आहे.

या खात्यात मोजक्या पदांना फार महत्त्व आहे. या पदावर नियुक्‍तीपासून निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले कर्मचारी अद्यापही या पदांवर ठाण मांडून आहेत. अशा कर्मचार्‍यांना नवीन येणार्‍या अधिकार्‍यांकडून अभय दिले जाते. त्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची हिंमत आजपर्यंत झालेली नाही. एवढेच नाही तर अनेक कर्मचार्‍यांचे साधे टेबल बदलण्याचे धाडस झालेले  दिसत नाही. बरेच कर्मचारी बदली झाली असताना आपली ‘कुवत’ दाखवून प्रतिनियुक्‍तीवर आहे त्या विभागात आहे त्या टेबलवर कार्यरत राहिल्याची उदाहरणे आहेत. या प्रवृत्तीमुळे ज्यांना कोणाचाही वरदहस्त नाही अशा कर्मचार्‍यांना नेहमी मोक्याच्या पदापासून वंचित रहावे लागत आहे.  त्यामुळे या धोरणामुळे अशा प्रवृत्तीना चाप बसणार नाही. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ असे होणार असे  वरदहस्त नसणार्‍या कर्मचार्‍यांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.  जि. प. त समुपदेशनाने बदलीचे धोरण राबविण्यात येते. मात्र, या धोरणात अनेकवेळा तक्रारी झाल्या आहेत. जागा रिक्‍त असतानाही ऑनलाईन रिक्‍त न दाखविता त्याजागी मर्जीतील कर्मचार्‍यांना संधी दिल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.

Tags : Kolhapur, Substantial, change, public, works