Mon, Apr 22, 2019 12:18होमपेज › Kolhapur › अमृत योजनेंतर्गत कामाचा सविस्तर अहवाल सादर करा

अमृत योजनेंतर्गत कामाचा सविस्तर अहवाल सादर करा

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

अमृत योजनेंतर्गत कामाचा ठेका 24 ऑक्टोबरला देण्यात आला. तेव्हापासूनच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने सोमवारी दिला. पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी रंकाळा प्रदूषणप्रकरणी याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. 

अमृत योजनेंतर्गत कोल्हापुरातील ड्रेनेज व्यवस्थेसाठी 59 कोटींचा निधी मंजूर झाला असून ठेकेदाराला वर्कऑर्डरही दिली आहे. या कामांतर्गत रंकाळा परिसरात 112 कि. मी. लांबीची पाईपलाईन टाकणे, दुधाळी नाल्यावर 6 एम. एल. डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासह इतर कामांचा समावेश आहे. परंतु, गेले काही महिने निविदा काढून वर्कऑर्डर देण्याबरोबरच इतरही कामे रखडली होती. त्यामुळे हरित लवादाने वारंवार आदेश दिल्याने वर्कऑर्डर देऊन कामाला सुरुवात झाली आहे.