Mon, Sep 24, 2018 01:20होमपेज › Kolhapur › डॉ. पाटणकरांवर गुन्हा दाखल करा : बजरंग दल

डॉ. पाटणकरांवर गुन्हा दाखल करा : बजरंग दल

Published On: Dec 17 2017 1:29AM | Last Updated: Dec 16 2017 11:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी देवस्थान समिती, पोलिस, श्रीपूजक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक मंदिरात प्रवेश केला. सोवळे नेसून गाभार्‍यात जाण्याची पद्धत  असताना त्याचे पालन केले नाही. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्याचा गुन्हा डॉ. भारत पाटणकर यांच्यावर दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने शनिवारी दुपारी राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांना देण्यात आले. 

निवेदनामध्ये गेले काही महिने मंदिरात वाद सुरू असल्याने आंदोलने झाली. यासंबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना गाभारा प्रवेश करण्यामागे काय हेतू होता. मंदिराच्या 100 मीटर परिसरात आंदोलनांना बंदी आहे. तरीही शुक्रवारी मंदिरात जमाव जमला याची चौकशी करावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

यावेळी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, महेश उरसाल, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, अवधूत भाटे, कल्याणकर, नितीश कुलकर्णी, जयकुमार शिंदे, कृष्णा मेखाडे आदी उपस्थित होते.