Tue, Jul 23, 2019 11:25होमपेज › Kolhapur › दुय्यम निरीक्षक परीक्षेत अमृता पाटील राज्यात दुसरी

दुय्यम निरीक्षक परीक्षेत अमृता पाटील राज्यात दुसरी

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 12:37AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट - क पदाच्या 300 जागांसाठी 24 सप्टेंबरला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दुय्यम निरीक्षक परीक्षेत महिला प्रवर्गामध्ये राजेंद्रनगर येथील अमृता गणपती पाटील हिने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला.

या परीक्षेत सांगली येथील शरद आठमुठे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांना 152 गुण मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पंधराहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत यश संपादन केले. अंकिता पाटील हिने महिला प्रवर्गामध्ये तृतीय क्रमांक मिळविला. तसेच किरण पाटील (पणुत्रे), सीमा केसरकर (बोरवडे, ता. कागल), क्रांतीसिंह माने, अमृत पाटील, अजय पाटील यांनीही यश संपादन केले.

पूर्वपरीक्षेला 2 लाख 29 हजार 65 उमेदवार पात्र ठरले होते. पूर्वच्या निकालाआधारे 4 हजार 345 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुख्य परीक्षेतून 300 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 
अंतिम निकालात आर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहीत नमुन्यात अर्ज करावेत, अशी माहिती आयोगाने संकेतस्थळावर दिली आहे.