होमपेज › Kolhapur › अखेर ‘स्टुंडट्स कौन्सिल’ निवडणूक कार्यक्रम जाहीर

अखेर ‘स्टुंडट्स कौन्सिल’ निवडणूक कार्यक्रम जाहीर

Published On: Jan 05 2018 1:14AM | Last Updated: Jan 04 2018 8:33PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

अखेर ‘स्टुडंट्स कौन्सिल’ निवडणुकीचा कार्यक्रम आज, गुरुवारी जाहीर झाला. ऐन  परीक्षेच्या तोंडावर तोडावर निवडणूक होणार आहे. 10 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होईल. कॉलेजस्तरावर 24 जानेवारीला निवडणूक होणार असून विद्यापीठ अध्यक्ष व सचिवपदाची निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. निवडणूक गुणवत्तेनुसार म्हणजे जुन्या पद्धतीने होणार आहे.

यंदा निवडणूक होणार की नाही, याची चर्चा 2017-18 वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होती. कारण, विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार सार्वत्रिक पद्धतीने निवडणूक होणार होती. प्रत्यक्षात मात्र स्टुंडट्स कौन्सिल निवडणूक डिसेंबर संपला, तरी झाली नाही. त्यामुळे यंदा निवडणूक होणार नाही, अशी स्थिती झाली असताना आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. 

कार्यक्रमानुसार 10 जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. कॉलेजस्तर आणि यानंतर विद्यापीठ स्तरावर ही निवडणूक होणार आहे. निवडणूक जुन्या पद्धतीने होणार असल्याने गुणवत्तेनुसार होणार आहे.  निवडणुकीसंदर्भात सर्व कॉलेज व्यवस्थापनांना यापूर्वीच नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.