Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Kolhapur › विद्यार्थी निघाले ‘इस्रो’ भेटीला

विद्यार्थी निघाले ‘इस्रो’ भेटीला

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 12:01AM

बुकमार्क करा

सुळकूड : वार्ताहर

जि. प. शाळांतील इयत्ता 5 वी ते 8 वी इयत्तांमधील 48 मुला-मुलींना बेंगळुरू येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ला भेट देण्याची संधी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जि. प. ने 2017 -18 मधील स्वनिधीतून आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. 

प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक इयत्तेतून एक (इयत्ता 5 वी ते 8 वी) विद्यार्थ्यांची (2 मुले अधिक 2 मुली) अशी एकूण 24 मुले व 24 मुली यांची निवड करण्यात येणार आहे.निवडीसाठी वैज्ञानिक द‍ृष्टिकोन, कल्पकता, जिज्ञासा, नावीण्यता यावर आधारीत निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. शाळास्तरावर मुख्याध्यापक आणि तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली 5 डिसेंबरअखेर ही निवड प्रक्रिया पार पडली.

तालुकास्तरावर निवड झालेल्या प्रतितालुका 12 विद्यार्थी (6 मुले व 6 मुली) याप्रमाणे 144 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड स्वरूपाची मुलाखत घेण्यात येणार आहे. या मुलाखतीद्वारे 24 मुले अधिक 24 मुली यांची निवड करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 12 डिसेंबरपर्यंत पार पडणार आहे.