होमपेज › Kolhapur › विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवावी : प्रा. राऊत

विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवावी : प्रा. राऊत

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:00PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

सध्याच्या युगात गुणवंत विद्यार्थी यशोशिखरावर पोहोचताना दिसत आहेत. मेरीटमध्ये येणे सहज शक्य आहे. त्यासाठी कष्ट करण्याची इच्छा असावी लागते. गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न मानता यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्रा. सर्जेराव राऊत यांनी केले.

दै. ‘पुढारी’ व चाटे क्‍लास यांच्यातर्फे इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, भास्कराचार्य स्कॉलरशीप वितरण व विशेष शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. रोख रक्‍कम, मेडल, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी दै. ‘पुढारी’चे ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, पालक प्रतिनिधी सौ. श्रुती चौगुले, चाटे समन्वयक प्रा. अशोक दुगाणे उपस्थित होते.प्रारंभी ऐश्‍वर्या हजारे व नम्रता खोत यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व पालक  यांचा सत्कार करण्यात आला. 
साक्षी चौगुले 97 टक्के, मेहेक भाई 97.60 टक्के, श्रीनिवास कोळी 97 टक्के, मयुरी राऊत 96.40 टक्के तसेच 95 टक्के च्या वरील 25 विद्यार्थ्यांना रोख रक्‍कम स्कॉलरशिपच्या स्वरूपात देण्यात आली. तय्यब मुल्ला, मेहेक भाई, साक्षी चौगुले या विद्यार्थिंनीनी मनोगत व्यक्‍त केले. 

यावेळी प्राचार्य टी. टी. पवार, एचओडी प्रा. चेतन पाटील, शाखा व्यवस्थापक प्रा. कमलाकर इंगळे, चाटे अ‍ॅकॅडमी इनचार्ज प्रा. रवींद्र पाटोळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. चेतन पाटील तर आभार प्रा. रवींद्र पाटोळे यांनी मानले.