होमपेज › Kolhapur › मुले नापास होऊच शकत नाहीत : तावडे

मुले नापास होऊच शकत नाहीत : तावडे

Published On: Jun 10 2018 1:02PM | Last Updated: Jun 10 2018 1:00PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुले नापास होऊच शकत नाहीत. त्यामुळे ज्या शाळांचे निकाल 30 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. अशा शाळांमधील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. मुले नापास होऊ नयेत, अशी संकल्पना घेऊनच संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मंत्री तावडे म्हणाले, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यापेक्षा मी प्रत्येक जिल्ह्यात नापास झालेल्या मुलांशी संवाद साधतो. कारण या मुलांमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करण्यास वाव आहे, हे समजते. गणित व इंग्रजी या विषयांत मुले नापास होतात. हे विषय काही विद्यार्थ्यांना कठीण जातात हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे विषय शिक्षकांनी अधिक सोप्या पद्धतीने शिकवण्याबाबत प्रशिक्षण उपयोगी ठरेल. 

निवेदन देण्यासाठी गर्दी

शिक्षणमंत्री तावडे यांना निवेदन देण्यासाठी सर्किट हाऊसवर विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी गर्दी केली. यावेळी मंत्री तावडे यांनी निवेदन स्वीकारत शिष्टमंडळांशी चर्चा केली.