Thu, Apr 25, 2019 12:13होमपेज › Kolhapur › विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्‍यांना ‘विमा कवच’

विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्‍यांना ‘विमा कवच’

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:53PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा निधी योजना सुरू केली आहे. या विमा कवचाच्या माध्यमातून यावर्षी 50 जणांना सुमारे 33 लाख रुपये देण्यात आले आहेत. 

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत अनुदानित व विनाअनुदानित असे 283 हून अधिक महाविद्यालये आहेत. यात सुमारे अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयात जाताना होणारे छोटे-मोठे अपघातामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. याशिवाय उपचार करण्याची काही पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने अचडणीचे ठरते. अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विद्यार्थी विकास विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी सुरक्षा निधी योजना सुरू केली आहे. 

योजनेत विद्यापीठ किंवा संलग्नित महाविद्यालये तसेच दूरशिक्षण केंद्रांतर्गत, पदव्युत्तर विभागात प्रवेशित विद्यार्थी, विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात, संशोधन संस्थेत, पदव्युत्तर अधिविभागामध्ये अर्धवेळ, पूर्णवेळ किंवा तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षक आणि शिवाजी विद्यापीठ कार्यालयातील आणि संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी लाभासाठी पात्र आहेत. 

वाहन अपघात मृत्यू, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू (पूर, भूकंप), कायमचे, अर्ध अपंगत्व, काही अवयव निकामी व नैसर्गिक मृत्यू झाल्यास 50 हजार ते 1 लाख रुपये देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यार्ंंना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांना नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे. 2014-15 रोजी सुमारे 30 लाभार्थींना सुरक्षा निधी योजनेचा लाभ झाला आहे.