Tue, Sep 17, 2019 07:55होमपेज › Kolhapur › अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Aug 26 2019 1:47AM | Last Updated: Aug 26 2019 1:47AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

अभ्यासाच्या तणावामुळे वैष्णवी पांडुरंग माने (वय 16, रा. कडवे, शाहूवाडी) या शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी पाचगाव येथे हा प्रकार घडला. सेमी इंग्लिशचा अभ्यास होत नसल्याने ती नियमित शाळेला जात नव्हती.

पांडुरंग माने शिक्षक आहेत. ते कुटुंबासह शाहूवाडीत राहण्?यास आहेत. त्यांचे बंधू शशीकुमार माने हे पाचगावमध्ये राहत असून सर्वजण त्यांच्या घरी आले होते. रविवारी सकाळी वैष्णवी बाथरूममधून बराच वेळ बाहेर आली नव्हती. दरवाजा तोडून आत पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे दिसून आले.    

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex