Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Kolhapur › कागलमध्ये विचित्र अपघात; एक ठार

कागलमध्ये विचित्र अपघात; एक ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कागल : प्रतिनिधी

पुणे-बेंगलोर चौपदरी महामार्गावर कागल येथील खोत मळ्यासमोर मध्यरात्री चार वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या वाहनांत जोरदार घडक होऊन ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. कांदा ट्रक  डिव्हायडर पार करून पलीकडच्या रस्त्याच्या चरीत जाऊन पडला, तर दोन ट्रक डिव्हायडरवर पडले. या अपघातामध्ये कांदा व्यापारी पप्पू जाधव (रा. सदलवाडी, ता. पुरंदर) हे जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिस स्टेशनचे पोलिस आणि आजूबाजूच्या लोंकानी ट्रकच्या चालकाला, तसेच मृत जाधव यांना काचा फोडून ओढून बाहेर काढले, तसेच अपघात पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांच्या मोटारसायलींवर ट्रक आदळला. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

कागलजवळील लक्ष्मी टेकडीवर असलेल्या एका क्रशरमधून काम आटोपून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर (एमएच 09 सीजे 8149) घेऊन चालक प्रवीण गुरव हे कागल शहरात येत होते. त्यावेळी  त्यांच्या मागून आलेल्या ट्रकने (क्र. एमएच 12 एचडी 4749) त्यांना जोराची धडक दिली. धडक इतक्या जोराची होती की, धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन तो रस्त्याच्या बाजूला फेकला गेला, तर ट्रकही रस्त्याच्या डिव्हाडरवर जाऊन उलटला. चालक गोंडिराम नारायणराव पळनाटे (रा. नळगीर, ता. लातूर) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले होते. त्यादरम्यान बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून हुबळीकडे मेडीसीन माल आणण्याकरिता जात असलेला ट्रकला (क्र. एमएच46 एआर 3299) मागून कांदा भरून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने (क्र. एमएच 12 एचडी 0841) जोराची धडक देऊन ट्रक महामार्गाचा डिव्हाडर चढून पलीकडे जाऊन रस्त्याच्या चरीत पडला. या ट्रकखाली अपघात झाल्याचे पाहण्यासाठी आलेल्यांच्या मोटारसायकली सापडून त्यांचेही नुकसान झाले.

यावेळी ट्रक उलटल्यामुळे केबिनमध्ये ट्रकचालक रमेश आजीनाथ आढसूळ (वय 23, रा. बिनसूर, ता. पाटोदा) अडकून पडला होता. त्याला पोलिसांनी आणि मदतीसाठी आलेल्या लोंकानी बाहेर ओढून काढला; मात्र चालकाच्या शेजारी बसलेले कांदा व्यापारी पप्पू जाधव यांना जोराचा मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यांची कवटी फुटली होती.अपघाताच्या ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. एका बाजूला चक्‍काचूर झालेले ट्रक आणि दुसर्‍या बाजूला चरीत पडलेला ट्रक व दोन तुकडे झालेला ट्रॅक्टर विखरून पडलेले होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Strange, accident, Kagal, One killed


  •