Sun, Jul 21, 2019 01:22होमपेज › Kolhapur › इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा रास्ता रोको

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा रास्ता रोको

Published On: May 29 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 9:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी

इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे, पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ करणार्‍या केंद्र सरकारचा धिक्‍कार असो, अशा घोषणा देत शिवसेनेच्या वतीने कावळा नाका येथे चारही बाजूला गाड्या उभ्या करून रास्ता रोको केला. यावेळी तीव्र निदर्शने करण्यात आली. रास्ता रोकोमुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास  शिवसैनिक कावळा नाका येथे जमा झाले. घोषणा देत शिवसैनिकांनी चौकातील चारही बाजूला गाड्या उभ्या केल्या. तसेच चौकातील चारही रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांना गाड्या बंद करण्यास विनंती करत सरकार निषेध नोंदवा, अशी मागणी केली. त्यानुसार अनेक वाहन चालकांनी काही काळ वाहने बंद ठेवली. 

संजय पवार म्हणाले, अच्छे दिन आयेगे म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारने गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर वाढ करणे सुरू केले आहे. हे सर्व पाहता ‘अच्छे दिन’च्या ऐवजी बुरे दिन सुरू झाले आहेत. इंधन दर आत तर शंभरी पार करते की काय, असा प्रश्‍न जनतेसमोर भेडसावत आहे.  इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे मासिक आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे केवळ बैठकांचा फार्स करून इंधन दरवाढ रोखणे अथवा कमी करणे अशक्यप्राय आहे. त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी. आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शुभांगी पोवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, सुजित चव्हाण आदी सहभागी झाले होते.