Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Kolhapur › काळभैरी मंदिर चोरीचा छडा दोन अट्टल घरफोड्यांना अटक 

काळभैरी मंदिर चोरीचा छडा दोन अट्टल घरफोड्यांना अटक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गडहिंग्लज/इचलकरंजी : प्रतिनिधी 

गडहिंग्लज येथील श्री काळभैरी मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी रेकॉर्डवरील दोघा अट्टल घरफोड्यांना गुरुवारी अटक केली. सूरज तानाजी काळे (वय 26, रा. दौंड, पुणे), सिद्धनाथ सुदाम गायकवाड (35, रा.गोरेवाडी, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही गडहिंग्लज येथील न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत. 

गडहिंग्लज येथे श्री काळभैरी मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दोन महिन्यांपूर्वी धाडसी चोरी झाली होती. काही दिवसांपूर्वी निपाणी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी करताना स्थानिकांनी दोघा चोरट्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने न्यायालयाच्या ताब्यातून काळे व गायकवाड यांचा ताबा घेतला होता.  तपासादरम्यान या दोघांनी काळभैरी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांवर पुणे, कर्नाटक, कोल्हापूर आदी पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 

या दोघांच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी जयसिंगपूरमधील जैन मंदिरात चोरी झाली होती. त्या अनुषंगानेही या दोघांकडे चौकशी सुरू आहे. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, Gadhinglaj crime, kalbhairee Temple, Stolen, burglars arrested,


  •